मुख्यमंत्री हतबल स्वतःचे परिवारही सुरक्षित ठेवता आले नाही – प्रवीण दरेकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी वाढत असलेली रुग्णसंख्या राज्यात पुन्हा एकदा राज्याला लॉकडाऊनच्या उंबरड्यावर आणूं ठेवले आहे असे भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविले होते. याच मुद्द्यावरुन भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री हतबल आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबाचंही संरक्षण करू शकले नाहीत अशा शब्दात दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ताशोरे ओढले आहे. तसेच काळाच्या त्यांच्या फेसबुक लाईव्हवर सुद्धा भाष्य केले आहे.

पुढे आव्हाडांच्या टीकेचा समाचार घेताना दरेकर म्हणाले की, आव्हाड म्हणतात २० लाख कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले? आव्हाडांनी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले हे एकदा तपासून पाहवं. केंद्र सरकारने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक मदत केली आहे. केंद्र सरकारने अन्नधान्यांपासून ते कोरोनाच्या लसीपर्यंत सर्व सुविधा महाराष्ट्राला दिल्या आहेत. त्याची आव्हाडांना कल्पना नसावी असा टोला त्यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: