मला माझ्या नवऱ्याचा अभिमान, आयपीएस अधिकारी समीर वानखडे बद्दल भ-भरून बोलली पत्नी

 

मुंबईतील ड्रग्स प्रकरणात जोरदार कारवाई करण्यात येत असून या सर्व कारवाईमध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखडे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. बॉलिवूडचे काही बडे सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आले तसं हे नाव आणखी प्रकाशझोतात आलं. शनिवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान या ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर तर समीर वानखेडे या नावाची चांगलीच चर्चा बॉलीवूडमध्ये सुरु झाली होती.

समीर वानखेडे हे एनसीबीच्या मुंबई कार्यालयात झोनल डायरेक्टर आहेत. शिवाय आपल्या एका आवडत्या मराळमोळ्या अभिनेत्रीचे पतीही आहेत. होय, समीर हे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. २०१७ साली क्रांती व समीर यांचा विवाह झाला. त्यांना जुळी मुलं आहेत. समीर वानखडे यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्या पत्नी करामती रेडकर यांना सरकथा अभिमान आहे. तसेहच त्यांनी बोलून सुद्धा दाखविले आहे. क्रांती रेडकर यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले असून अभिनेता भारत जाधव यांच्या बरोबर केलेल्या एका चित्रपटामुळे चांगल्याच प्रसिद्ध झोतात आल्या होत्या.

काय म्हणाली क्रांती?

समीर हे अतिशय मेहनती आहेत. वेगवेगळी प्रकरणं, त्याअनुषंगानं त्यांची कारवाई सुरूच होती. पण बॉलिवूडशी संबंधित काही ड्रग्ज प्रकरणांमुळे ते चर्चेत आले. ते सतत कामात असतात आणि मी त्यांना त्यांची ‘स्पेस’ देते. काय झालं, कसं झालं, हे मी त्यांना कधीच विचारत नाही. कारण मी त्यांच्या नोकरीचा, त्यातील गोपनियतेचा आदर करते.

घराचा सगळा जिम्मा मी सांभाळते, जेणेकरून त्यांना त्यांचं काम करता यावं. कधीकधी ते इतके बिझी असतात, की झोपतही नाहीत. 24/7 ते कामात असतात आणि फक्त 2 तास झोपतात. एखाद्या केसवर ते कोणाशी फोनवर बोलत असतील तर मी त्यांत कधीच ढवळाढवळ करत नाही. ते रोज गुप्त मोहिमांवर, प्रकरणांवर काम करत असतात आणि याबद्दल घरी कोणाशीही काहीही शेअर करत नाही. घरी आल्यावरही ते स्वस्थ बसत नाही. टीमच्या सतत संपर्कात असतात, असं ती म्हणाली.

Team Global News Marathi: