माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये’

 

मुंबई | एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील जवळपास 40 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेसाठी हा अतिशय मोठा धक्का होता. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलाच. मात्र, आपला पक्ष वाचवण्याचं मोठं लक्ष्यही त्यांच्यापुढे निर्माण झालं.

राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींनी राजकारणात वेगळंच वळण आणलं. यावर आता शिवसेना पक्षप्रमुख यांनी संजय राऊत यांच्यासोबतच्या मुलाखतीमध्ये रोखठोक उत्तर दिली आहेत. मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं.

आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे. पुढे त्यांनी आवाहन केलं की, आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोकं घडवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना, माताभगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, चला परत उठा. आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया.

ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या तत्कालीन सरकारच्या कामाला खो, पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या कामांना स्थगिती

आजपासून देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू, खरेदीसाठी ‘या’ 4 कंपन्या शर्यतीत

Team Global News Marathi: