आता तुम्ही शिवसेनाप्रमुख होणार का? प्रश्नावर बंडखोर आमदार शिरसाट संतापले

 

‘आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायचं नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. शिवसेनाप्रमुख हे शिवसेनाप्रमुख आहे. त्यांच्या पायाजवळ राहू, आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायची गरज नाही. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा होऊ शकत नाही. आमची लायकी नाही. आम्ही त्यांची बरोबर करू शकत नाही, आज त्यांचा आशिर्वाद जरी घेतला तरी खूप झालंय. एक वेळ तुम्हाला विसरू पण शिवसेनाप्रमुखांना विसरू शकत नाही’ असं म्हणत शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

शिंदे गटाने बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. या सगळ्या भूकंपानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून आपल्या रोखठोक बाजू मांडली. या मुलाखतीमुळे शिंदे गटामध्ये खळबळ उडाली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उद्धव ठाकरेंनाच उत्तर दिलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी खूप मोठे आहे. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही आमदार, खासदार झालो आहोत. तुम्हाला राजकारण करायचे आहे तर बाळासाहेबांचं वापर कशाला करता. एका दर्जेवर गेलेला मोठा नेत्याला खाली खेचू नका. बाळासाहेबांनी कधी शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय सभा सुरू केली नाही. शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. हे प्रत्येक शिवसैनिकाचे दैवत्त आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, असं शिरसाट म्हणाले.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा होऊ शकत नाही. आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायचं नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. शिवसेनाप्रमुख हे शिवसेनाप्रमुख आहे. त्यांच्या पायाजवळ राहू, आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायची गरज नाही. आमची लायकी नाही. आम्ही त्यांची बरोबर करू शकत नाही, आज त्यांचा आशिर्वाद जरी घेतला तरी खूप झालंय. एक वेळ तुम्हाला विसरू पण शिवसेनाप्रमुखांना विसरू शकत नाही, असं शिरसाट म्हणाले.

माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये’

शिंदे-फडणवीस सरकारच्या तत्कालीन सरकारच्या कामाला खो, पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या कामांना स्थगिती

Team Global News Marathi: