‘मातोश्री’ला आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आहे कोण ?

 

मुंबईत सध्या शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीवर जाऊन अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच निवासस्थान बाहेर हनुमान चालीसाचं पठण करणारच, असा निर्धार अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावंच, असं प्रतिआव्हान शिवसेनेने दिलं आहे.

या हनुमान चालिसाच्या निमित्ताने नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नवनीत राणा कोण आहेत, त्यांच्या इथवरचा आतावरचा प्रवास कसा राहिला आहे, हे आपण यानिमित्ताने जाणून घेणार आहोत. नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून 2019 साली खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यांनी शिवसेना पक्षाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून त्या विजयी झाल्या आहेत.

नवनीत यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पंजाबी आणि दक्षिण भारतीय सिनेमात काम केलंय. राजकारणात येण्याआधी नवनीत या अभिनेत्री होत्या, हे काही मोजक्यांनाच माहिती आहे. नवनीत यांनी १२ वी पास झाल्यानंतर मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी एकूण ६ अलब्मसाठी काम केलं. कौर यांनी आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली. नवनीत यांचे आई-वडील हे मुळचे पंजाबचे. त्यांचे वडील आर्मीत ऑफिसर होते.

नवनीत राणा यांना योगामध्ये विशेष आवड होती. त्या बाबा रामदेव यांच्या भक्त होत्या. नवनीत बाबा रामदेवा यांना वडिलांसारखं मानतात.
नवनीत आणि रवी राणा या दोघांची लव स्टोरी ही फिल्मी स्टोरीपेक्षा भारी आहे. या दोघांची पहिली भेट ही योगगुरु रामदेव बाबा यांच्या योगा कॅम्पमध्ये झाली. इथेच या दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतंर मैत्रीत झालं. त्यानंतर या दोघांनी नातं पुढं नेण्यासाठी रामदेव यांची परवानगी घेतली आणि पुढचं पाउल टाकत सामूहिक विवाह सोहळ्यात सात फेरे घेतले.

Team Global News Marathi: