बॅरिकेटस तोडून शिवसैनिक घुसले राणा दाम्पत्याच्या घरात, वातावरण चिघळण्याची शक्यता

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी अर्थात मातोश्रीजवळ हनुमान चालीसा म्हणण्याच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अडविण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत. खार परिसरातील घरात आमदार राणा दाम्पत्य थांबले आहेत, या घराबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले आहेत.

राणा दाम्पत्य घराबाहेर पडणार असल्याचं समजताच शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या इमारतीकडे जाणारा रस्ता बॅरिकेटस लावून बंद केला होता. मात्र, काहीवेळापूर्वीचशिवसैनिक या बॅरिकेटसवर चढले आणि राणा दाम्पत्याच्या घराच्या दिशेने चाल करून गेले आहेत.

शिवसैनिकांनी मोठा जमाव पोलिसांचा वेढा तोडून आता राणा दाम्पत्याच्या इमारतीच्या बाहेर पोहोचला आहे. याठिकाणी जमून शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. कालपासून शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या इमारतीपासून काही अंतरावर होते. मात्र, आता शिवसैनिकांचा जमाव इमारतीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याला इमारतीमधून बाहेर पडणे शक्य नाही. शिवसैनिक राणा दाम्पत्याला बाहेर येण्याचे आव्हान देत आहेत. मात्र, अजूनपर्यंत नवनीत राणा किंवा रवी राणा घराबाहेर आलेले नाहीत. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे येणाऱ्या काही वेळात समोर येईल.

Team Global News Marathi: