विवाहित पुरुषांनी आहारात या 5 गोष्टी घ्यायलाच हव्यात; काही दिवसात दिसतील जबरदस्त परिणाम

विवाहित पुरुषांनी आहारात या 5 गोष्टी घ्यायलाच हव्यात; काही दिवसात दिसतील जबरदस्त परिणाम

नवी दिल्ली : आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी लैंगिक आरोग्यावर परिणाम करतात. विवाहित पुरुषांनी (Married men diet) आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश आवर्जून करणे आवश्यक आहे. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण वाढवते आणि या गोष्टींच्या सेवनाने पुरुषांमध्ये स्टॅमिना(Married men sexual Wellness) वाढतो.

 

खाण्यापिण्याच्या काही गोष्टी वैवाहिक जीवन सुखी बनवतात तर काही गोष्टी अशा असतात ज्यांचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो.

 

प्रत्येक माणसाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो हे तुम्ही ऐकलेच असेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर ही म्हण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, खाण्यापिण्याच्या सवयी आणि खाण्यापिण्यात वापरल्या जाणार्‍या गोष्टींचा वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होतो.

खाण्यापिण्यामुळे वैवाहिक जीवनावरही परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या काही गोष्टी वैवाहिक जीवन सुखी बनवतात तर काही गोष्टी अशा असतात ज्यांचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो. वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधांना महत्त्वाचे स्थान आहे आणि आपल्या खाण्याच्या सवयींचा त्यांच्यावर थेट परिणाम होतो.

हे केवळ पुरुषांनाच लागू नाही , तर स्त्रियांच्या संदर्भातही ते पूर्णपणे खरे आहे. खाण्यापिण्यात प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने उर्जा पातळी कायम राहते. याशिवाय शरीराला इतर पोषक तत्वांचीही तेवढीच गरज असते.

तज्ज्ञांच्या मते, प्रोटीनयुक्त गोष्टी खाल्ल्याने आपल्याला फायदा होईल. यामुळे ऊर्जा पातळी कायम राहते. याशिवाय व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि झिंकने समृद्ध पदार्थ खाण्यावर भर द्यायला हवा. जाणून घेऊया हे घटक मिळवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी आहारात घ्यायला हव्या.

केळी (Banana)

केळीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणात असते. केळीच्या नियमित सेवनाने पुरुषांमधील लैंगिक समस्या दूर होतात. त्यामुळे दररोज एक केळ खाणेही फायदेशीर ठरते.

पालक

पालक सर्वांसाठीच फायदेशीर आहे. विवाहित पुरुषांनी तर पालक नक्की खावे, तुमच्यासाठी ते जास्त फायदेशीर ठरेल. पालकच्या हिरव्या पानांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. याचा चांगला परिणाम तुमच्या कामजीवनावर दिसून येतो.

लसूण

लसणात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6, फॉस्फरस, मँगनीज, झिंक, कॅल्शियम आणि लोह असते. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. लसणाच्या सेवनाने रक्ताभिसरण वाढते. टेस्टोस्टेरॉन संप्रेरक वाढवण्यासाठी देखील लसूण उपयुक्त आहे.

हे वाचा –

मनुका

विवाहित पुरुषांनी मनुका खाणे खूप फायदेशीर आहे. यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढते आणि पुरुषांमधील लैंगिक समस्या दूर होतात. मध आणि मनुका यांचे सेवन करा, याचा विशेष फायदा होईल.

कोरड्या खजूर (खारीक)

खारीक खाल्ल्याने पुरुषांचा स्टॅमिना वाढतो. खारकांमध्ये अमिनो अॅसिड असतात आणि त्याचे सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

 

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. ग्लोबल न्यूज याची हमी देत नाही.)

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: