मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच झळकले १६८०० फुटाचे होर्डिंग

 

मुंबई | प्रवीण तरडे दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट ‘धर्मवीर मु.पो.ठाणे’ हा येत्या १३ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाने, चित्रपटाचे प्रमोशन करण्याची कोणतीच कसर सोडलेली नाही. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा खास शोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अभिनेता सलमान खान याने हजेरी लावली होती.

आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी संपूर्णपणे सज्ज झाला आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे ‘लोककारणी’ धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर चित्रीत करण्यात आला आहे.

या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबाबत समोर प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे चित्रपटाच्या प्रसिद्धीत भर पडली आहे. अशी गोष्ट मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये किंवा जाहिरात तंत्रात कधीच घडली नव्हती.

Team Global News Marathi: