बिन-सोन्याचं मंगळसूत्र.. एका डॉक्टरांच्या नजरेतून

बिन-सोन्याचं मंगळसूत्र.. एका डॉक्टरांच्या नजरेतून

डॉ. राजस देशपांडे
न्यूरॉलॉजिस्ट पुणे.

रागारागातच मी आयसीयूत शिरलो. रात्रभर एका आजोबांसाठी कॉल येत राहिले होते. त्यांच्या हृदयाची गती सारखी कमीजास्त होत होती, ठोके देखील अनियमित होत होते. हृदयगती अनियमित असली कि हृदयातच रक्ताच्या गाठी तयार होतात. अशीच एक गाठ मेंदूपर्यंत जाऊन त्या आजोबांना अर्धांगवायू / पॅरालिसिस चा झटका काल आला होता.

पण माझ्या रागाचं कारण ते नव्हतं..
त्या सकाळी घरात खूपच वादविवाद झाले होते. आधीच झोप झाली नव्हती, कुणी आरडाओरडा केला, आवाज वाढवला, तर्कशून्य वाद घातला की मला संताप आवरत नाही. आधी मी उत्तर द्यायचो, समजावून सांगायचो, पण नंतर एक महत्वाची गोष्ट शिकलो: illogical किंवा तर्कशून्य व्यक्तीशी वाद घालून अजिबात उपयोग नसतो. वेळ वाया जातो आणि संबंध आणखीनच बिघडतात. दर वेळेस समोरच्या व्यक्तीचीच चूक नसते, माझी पण असते, पण थोडक्यात शांतपणे मुद्दा मांडणे हा एकमेव वादविवाद सोडविण्याचा मार्ग मला जमतो. आरडाओरडा फार वाढल्याने मी नाश्ता न करताच बाहेर पडलो. बघू, वेळ मिळाला तर कॅन्टीन मध्ये खाऊ.

पण रस्ताभर ट्रॅफिक सुजलेली होती. आपण घाईत असलो, कि जग स्लो मोशन मध्ये चालतं. त्यात आमचं ई ई जी , ई एम जी तपासणीचं मशीन आज बंद पडलं होतं! दहा बारा लाखांचा फटका.. आणखी एक कर्ज! सिग्नलवर फोनमधले मेसेजेस तपासले, तर घराचे instalment, फोन बिल, कर्जाच्या नोटिसा पाहून लगेच फोन बंद केला. पण फोन एखाद्या नेत्यासारखा निर्लज्ज! लगेच वाजला. एका साहेबांना दोन वर्षांनी फोनवरच नवीन प्रेस्क्रिप्शन हवं होतं. येऊन भेटा म्हणालो तर म्हणाले “म्हणजे फीस भरावी लागेल का?”.

पुरुष वर्गाची वासना आणि त्यातून निर्माण होणारे बाईचं प्रेम वाचा…….

माझ्या रूमच्या दारातच एक अंगभर गोंदलेले, सोन्याने मढवलेले स्नायुवान पैलवान उभे होते. “डॉक्टर, आमच्या पेशंटचं बिल जरा कमी करून द्या. इतकं बिल कसं भरायचं आम्ही गरिबांनी?” धमकीवजा आवाजात त्यांनी विनंती केली. त्यांच्या मागे माझ्या पेशंटचे नातेवाईक अगदी निर्विकार चेहऱ्याने जणू मला ओळखतच नसावेत असे उभे होते. पंधरा दिवसांपूर्वी कोमात आलेला त्यांचा मुलगा आज बरा होऊन घरी चालला होता. त्यांना आमच्या दवाखान्याच्या समाजसेवकाकडे पाठवून मी बॅग ठेवली, आणि रागारागातच आयसीयूत शिरलो होतो.

नव्वदीतले ते वृद्ध आजोबा शांत झोपले होते. मी हार्ट मॉनिटरकडे पाहिलं. त्यांची हृदयगती नियमित झाली होती, बीपी देखील नॉर्मल होतं. माझी धडधड जरा कमी झाली. मी त्यांना तपासायला लागलो.

‘मोकळं आभाळ’ पती-पत्नी मधील संवाद कसा असावा..!

शेजारच्या बाकावर झोपलेल्या त्यांच्या पत्नी लगबगीनं उठल्या. ऐंशीतील त्या आजीबाईंच्या गोऱ्यापान , सुसंस्कृत चेहेऱ्यावर लहानसं हसू उमटलं. हात जोडून त्या म्हणाल्या ” नमस्कार डॉक्टर. आज सकाळी हे जरा तरतरीत दिसले. मला बोलले, बरं वाटतंय म्हणाले. थोडा चहा पण पिला त्यांनी. पण अजून उजव्या हातात अशक्तपणा आहे”.

अतिशय साधी, ठिगळं लावलेली साडी, काळ्या मण्यांचं बिन सोन्याचं मंगळसूत्र, फाटक्या स्लीपर्स, सुरकुतलेला चेहरा आणि डोळ्यातलं पाणी त्यांची परिस्थिती कळायला पुरेसं होतं. पण बहुधा सकाळीच आवर्जून लावलेलं लालभडक ठळक भलंमोट्ठं कुंकू त्यांच्या मनातील भावना सांगत होतं!

वयामुळे थोडीशी वाकलेली ती माउली पुढे बोलली: “डॉक्टर, आमचं वय खूप आहे, पण आम्ही दोघंच आहोत एकमेकांना. चांगल्यात चांगली औषधं द्या त्यांना. पैशांची व्यवस्था करेन मी, पण त्यांना लवकर बरं करा”. असं बोलत असतानाच त्या एकदम खाली वाकल्या आणि माझ्या पायाला त्यांनी हात लावला “तुम्ही आमच्यासाठी देवासारखेच आहात डॉक्टर, तुमच्या पाया पडते”.

पॉझिटिव्ह : मनाची अफाट शक्ती आणि तुमचे आरोग्य; नक्की वाचा जीवनात बदल जाणवेल..

दचकून मी मागे सरकलो! एखादा विजेचा शॉक बसावा तसं मला झालं. भानावर येत मी त्यांचा हात हातात धरला, आणि त्यांना म्हणालो, “अहो तुम्ही मोठ्या आहात माझ्यापेक्षा. पाया नका पडू. आम्ही सगळे प्रयत्न करू. आता बरेच आहेत ते, एक-दोन दिवसात सुट्टी पण करता येईल असं वाटतं”.

आपल्याहून मोठ्या व्यक्तीनं पाया पडणं फार लागतं. ती लायकी कुणाचीच नसते! मीही त्यांच्या पाया पडलो. (नाहीतर माझ्या आई-वडिलांनी स्वर्गातून खाली येऊन माझे कान धरले नसते का?).

आज्जीबाईंनी त्या आजोबांना हलवून जागं केलं. “अहो बघा कोण आलंय. आपले डॉक्टर आहेत. चला नमस्कार करा त्यांना!”
त्या आजोबांनी डोळे किलकिले करत माझ्याकडे पाहिलं.
दोन्ही हात उचलण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण उजवा हात काही उचलेना, म्हणून फक्त डावाच हात त्यांनी कपाळापर्यंत नेला. “नमस्कार” घोगऱ्या, खोल आवाजात ते म्हणाले.

तुमचे मनच आहे तुमच्या जीवनाचा व्यवस्थापक; वाचा सविस्तर कसे ते

दोनच दिवसांपूर्वी माझी त्यांची अजिबात ओळख नव्हती. पण आज माझ्यापेक्षा अनेक दशकं मोठं असलेलं ते जोडपं मला हात जोडून नमस्कार करत होतं. माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून मी सांगेन त्याप्रमाणे इलाज करायला तयार होतं. खरंतर पेशंट सिरीयस असतांना अनेक शंका-कुशंका मनात येतात, पण त्यांचा राग डॉक्टरवर काढला जातो, शंकेखोर नातेवाईक असले, की डॉक्टरही बॅकफूटवरच ट्रीटमेंट करतात. तसं इथं काही नव्हतं.

मी फोन ‘स्विच ऑफ’ केला. मला जराशी लाजही वाटली. कुठलाही रुग्ण दवाखान्यात येताना एक चांगला, प्रसन्न, हसरा, मदतशील डॉक्टर भेटेल या अपेक्षेनंच येतो. डॉक्टरांनाही खाजगी समस्या असतात यात त्या रुग्णाचा बिचाऱ्याचा काहीही दोष नसतो. त्यामुळे रागीट. चिडचिडा डॉक्टर भेटला की आधीच त्रस्त असलेले रुग्ण आणखीच खजील होतात. पण या आजीबाईंच्या श्रद्धेमुळे माझ्यातील डॉक्टरला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली होती. कधीकधी खाजगी आयुष्यातील तणाव एका चांगल्या डॉक्टरला देखील अपूर्ण बनवू शकतात. रागावर आणि भावनांवर नियंत्रण हा प्रत्येकच डॉक्टरमध्ये आवश्यक असणारा एक महत्त्वाचा गुण आहे. वर्षानुवर्ष एक चांगला डॉक्टर होण्यासाठी अभ्यास, मेहनत केल्याचे समाधान मिळते, ते रुग्णाच्या श्रद्धेतूनच. या विश्वासासाठीच बहुतांश डॉक्टर जगतात आणि झटतात.

प्रेम करताय ना! मग एकमेकांना गृहीत धरून कसे चालेल ; वाचा सविस्तर अनोखी कहाणी

“काहीही लागलं तर सिस्टरांना सांगा, त्या मला फोन लावून देतील” मी त्या आजीबाईंना सांगितलं.
“नो चार्जेस फॉर मी” असं त्यांच्या फाईलवर लिहून मी तिथून बाहेर पडलो. त्यांना गुरुदक्षिणा तर द्यायलाच हवी ना!

माझा राग आता पार पळाला होता. सकाळचे वादविवाद, ट्रॅफिक, बिघडलेले मशीन वगैरे सगळे प्रॉब्लेम आता एकदम लहान वाटायला लागले. हे प्रॉब्लेम्स उद्यापर्यंत संपलेले असतील, पण मी असेन, माझे रुग्णही असतील! आता दिवसभर भेटणाऱ्या रागावलेल्या, घाबरलेल्या, शंकेखोर, भांबावलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रसन्न चेहऱ्यानं भेटायला मी तयार होतो. शेवटी, डॉक्टरांवर नाही, तर रुग्ण चांगल्या इलाजासाठी कुणावर विश्वास ठेवणार? हाणामारी, जातपात करणाऱ्या राजकीय नेत्यांवर? सिरीयस पेशंटला घेऊन कुणी “साहेबांच्या बंगल्यावर” थोडंच जातात, दवाखान्यातच येतात. अनोळखी असले, तरी डॉक्टर सगळ्यांचेच इलाज सारखेच करतात, सगळ्यांचाच जीव वाचवण्यासाठी धडपडतात ना?आमचा डॉक्टरी पेशा देखील एखाद्या बिन-सोन्याच्या मंगळसूत्रासारखाच: अतिशय पवित्र, श्रद्धा आणि विश्वासाचं बंधन, तितकंच जिवलग, ज्याच्यात पैशाला किंमतच नाहीये!

प्रेम म्हणजे काय असते ? दोन मिनिटे वेळ काढून हे वाचाच !

एक गोष्ट मात्र अगदी खरी आहे. जो रुग्ण एखाद्या डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवतो, त्या रुग्णासाठी तो डॉक्टर नेहमीपेक्षा खूप जास्त मेहनत करतो. स्वतःला कळलं नाही तर इतर डॉक्टरांकडून त्या रुग्णाचे भले करण्याचा प्रयत्न करतो. पैशाचा विचार करत नाही. गैरसमज झाले तर वेळ घालवून ते दूर करतो. पण प्रत्येकच “शंकेखोर, दबावखोर, गुंड प्रवृत्तीच्या” रुग्ण आणि नातेवाईकांसाठी हे करणे त्याला शक्यच नसते. म्हणून आजकाल डॉक्टर लोक आपली बहुतांश मेहनत, प्रयत्न हे अशा विश्वासानं आलेल्या पेशंटसाठी राखून ठेवतात.

दोन दिवसांनी त्या आजोबांना डिस्चार्ज मिळाला, तेव्हा त्या आज्जीबाई मला भेटायला आल्या. हातातला डब्बा हट्टानं माझ्या हातात देत म्हणाल्या “आज सकाळी मुद्दामून घरी जाऊन माझ्या हातानं पुरणपोळी करून आणलीय तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी. नक्की खा. आमच्या यांना पण खूप आवडते, आज घरी नेऊन खाऊ घालेन”.

प्रेमात पडताना मुली मुलांमध्ये नेमकं काय पाहतात??? ; वाचा मुली इंप्रेस होण्याची सविस्तर कारणे

डॉ. राजस देशपांडे
न्यूरॉलॉजिस्ट पुणे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: