प्रेमात पडताना मुली मुलांमध्ये नेमकं काय पाहतात???
आपण दुसऱ्या कुणालातरी आवडावं हा मानवाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे स्त्री असो कि पुरुष इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. किंबहुना इम्प्रेस म्हणण्यापेक्षा आपले इम्प्रेशन समोरच्यावर पडावे यासाठी स्त्री-पुरुष प्रयत्नशील असतात.
प्रेम प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं अनेकदा तुमच्या कानावर आलं असेल. मुलंच प्रेमात पडतात असं काही नाही. मुलीही अनेकदा मुलांच्या प्रेमात पडतात, एवढंच नव्हे तर प्रपोज करण्यासाठी पुढाकार देखील घेतात. फक्त विषय एकच… मुलींना मुलगा आवडायला पाहिजे. त्यासाठी त्यांच्या काही अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या मुलाला मुली कधीच नाही म्हणत नाहीत. साधारणतः मुलींच्या अपेक्षा काय असतात?
-अनेकांना रंग रुप महत्त्वाचं वाटतं. मात्र सगळ्याच मुली या कॅटेगिरीतल्या नसतात. रंग रुपापेक्षा देखील अन्य महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्यांना मुली पसंती देतात. सुरक्षितता ही मुलींच्या प्राधान्याची गोष्ट असते. ज्याच्या कवेत आपल्याला सुरक्षित वाटेल, जो आपल्याला वाईट वृत्तीपासून वाचवू शकतो, अशी मुलं मुलींची पहिली पसंती असतात.
स्त्रियांच्या तुलने पुरुष किंवा तरुण मुलं मुलींना आकर्षित करण्यासाठी जास्त प्रयत्नशील असतात असे दिसून येते. मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी मुलं अनेकदा विविध गोष्टी करत असतात. मात्र यामुळे कधी मुली इम्प्रेस होतात किंवा कधी त्यांच्यावर आपला नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे मुलींना नेमक्या कोणत्या गोष्टी आवडतात, मुलांमध्ये त्या कोणत्या गोष्टी बघतात याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घेऊयात आजच्या लेखात याविषयी खास माहिती.
व्यक्तिमत्व : व्यक्तिमत्व अर्थात पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्व ही सर्वांत मोठी गोष्ट आहे ज्याचे मुली निरीक्षण करतात. मुलगा कसा आहे, त्याचे बोलणे, त्याचे उठणे-बसने, बोलणे चालणे कसे आहे यावरून मुली मुलाची पर्सनॅलिटी ठरवत असतात. मुलगा फारच मिळमिळीत असेल तर मुलींना असे मुलं शक्यतो आवडत नाहीत.
पती पत्नीचं नातं कस असावं ; वाचा सविस्तर-
स्मार्ट : मुलींना स्मार्ट अर्थात हुशार आणि बुद्धिमान मुले आवडतात. कोणतेही काम स्मार्ट पद्धतीने तसेच उत्साहपूर्णतेने करणाऱ्या मुलांवर मुली भाळतात. आळशी तसेच सतत कामाबद्दल रडारड करणारे मुलं मुलींना आवडत नाहीत. स्मार्ट तसेच बुद्धिमान मुले मुलींना आवडतात.
आदर : आदरपूर्वक वागणूक देणारे मुलंदेखील मुलींना आवडतात. स्त्रियांवर, मुलींवर त्यांच्या चारित्र्यावर नकारात्मक बोलणारे, त्यावर विनोद करणारे मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. स्त्रियांबरोबरच समाजातील वेगवेगळ्या घटकांना मुलं किती आदरपूर्वक वागणूक देतात यावरून देखील मुली मुलांची योग्यता ठरवतात.
उद्या आपल्या वयात येणाऱ्या मुलाला हे कळलं तर..? चाळीशीतील वावटळ…! भाग 3
प्रेमळ : प्रेमळ तसेच मितभाषी असणारे मुलं मुलींना आवडतात. सतत चिडचिड करणारे, रागीटपणे बोलणाऱ्या मुलांना मुली इग्नोर करतात. तसेच मुलींना त्यांची काळजी घेणारे मुलं आवडतात. त्यामुळे मुलींशी कठोरपणे न वागता प्रेमळपणे आणि मितभाषी वागणे मुलांसाठी योग्य आहे.
क्रमश: मन आणि शरीराचे खेळ ;चाळीशीतील वावटळ…!
पैसे : वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींमधील सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे होय. मुलगा किती पैसे कमावतो, कमावतो कि नाही, आर्थिक बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे का या सर्व गोष्टीदेखील मुली पाहतात. भविष्यात मुलगी ज्या मुलाची जीवनसाथी व्हायचा विचार करत असेल, तर अशी मुलगी त्या मुलाची आर्थिक बाजू नक्की बघेल.
आणि दुसऱ्या दिवसापासून ती मुलांमध्ये मुस्कान पेरू लागली !!! चाळीशीतील वावटळ…! अंतिम भाग – 4
स्वभाव आणि आर्थिक स्वातंत्र्यानंतर मुली काय पाहात असतील तर ते मुलाचं घर आणि त्याच्या घरचे… सुसंस्कृत लोकांना मुली कायमच पसंती देतात. चांगलं घर आणि सुसंस्कारी कुठल्याही मुलीला हवे असतात. त्यामुळे तिच्या आयुष्यात काही अडचणी उभ्या राहण्यापासून वाचू शकतात.
रुप नाही म्हटलं तरी एक महत्त्वाची गोष्ट आहे. साधारणतः वरील सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मुली रुपाला पसंती देतात.सहसा गोरा मुलगा असेल तर फारच चांगली गोष्ट, मात्र मुलगा गोरा नसेल आणि ठिकठाक असेल तर मुलगी वरच्या गोष्टींच्या आधारे त्याची निवड करतात. किमान रंग नाही रुप तरी व्यवस्थित असावं, ्अशी मुलींची किमान अपेक्षा असते.
मी जसं तुमचं ऐकलं तसं तुम्हीही माझं ऐकायलाच हवं ना ! चाळीशीतील वावटळ ,भाग 2
-मुलगा कुठं राहतो? कोणत्या एरियात राहतो. या गोष्टीसुद्धा मॅटर करतात. मुलगा चांगल्या एरियात राहात असेल तर त्याला पहिली पसंती दिली जाते.
-भारतात सुशिक्षितता वाढत असली तरी आपल्या समाजावरील जातीचा पगडा अद्याप कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे सर्वच नसल्या तरी काही टक्का मुली तरी प्रेमात पडतानाही जातीला महत्त्व देतात. काही मुली तर चक्क प्रेमात पडतात, मात्र तो आपल्या जातीचा नाही हे कळल्यावर त्याचा नाद सोडून देतात. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी प्रेमात पडतानाही आपल्याकडे जात पाहिली जाते हे सत्य आहे.
-आजकाल सोबत शिकणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडण्याकडे मुलींचा कल असतो. मात्र असंही होतं की सोबत शिकणाऱ्यांव्यतिरिक्त मुलंसुद्धा मुलींना आवडू शकतात. अशावेळी त्या मुलाच्या शिक्षणाचा विचार केला जातो.
वरील गोष्टी पाहूनच मुली प्रेमात पडतात, असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल. कारण प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. या गोष्टींचा कोणताही विचार न करता प्रेमात पडणाऱ्या मुली आहेत. यापेक्षा निश्चित काही वेगळ्या गोष्टीही मुली पाहात असतील. एखादी गोष्ट सांगायची राहिली असेल तर ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा…