‘मला मामी हाक मारल्यावर फारच मज्जा येते’; बस बाई बसच्या मंचावर मिसेस फडवीसांनी स्पष्ठ सांगितले

 

बस बाई बस या झी मराठीवरील कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. येत्या आठवड्यात या मंचावर अजून एक खास आणि प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावणार असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस. अमृता फडणवीस यांनी या भागात बऱ्याच गोष्टी शेअर केल्याचं नव्या प्रोमोमध्ये दिसून आलं आहे. या भागात अमृता फडणवीस एका खास गोष्टीचा खुलासा करताना दिसणार आहे.

देवेंद्र यांना ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणजे मामु असं म्हटलं जातं तर त्या न्यायाने अमृता यांना मामी अशी ओळख मिळाली आहे. या प्रोमोमध्ये एक महिला त्यांना या ओळखीबद्दल काय वाटतं असं विचारल्यावर त्या व्यक्त झाल्या, “मला तर मामी म्हणून संबोधतात ते फारच आवडतं.मला फारच मजा येते.” तसंच या प्रोमोमध्ये देवेंद्र आणि अमृता यांच्यातला एक खट्याळ संवाद सुद्धा बघायला मिळणार आहे. देवेंद्र यांच्या फोटोशी संवाद साधताना त्या म्हणतात, “अरे वा! आज वेळ मिळाला वाटतं.

कुठे नेताय फिरायला? आसाम ला?” मागच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमध्ये आसाम, गुवाहाटी, सुरत अशी अनेक शहरं जोडली गेली होती. त्याचा संदर्भ लावत अमृता जबरदस्त उत्तर देताना दिसत आहेत.

Team Global News Marathi: