बिष्णोई गॅंगकडून धमकी मिळाल्यानंतर सलमानने खरेदी केली नवी बुलेटप्रूफ कार

 

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आपल्या अनोख्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.मग कधी तो बिंग ह्युमनचा शर्ट घातला म्हणून चर्चेत असतो तर कधी फार्म हाऊसवर पार्टी केली म्हणून चर्चेत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सलमान सुरक्षेच्या मुद्द्यावरून चर्चेत आला होता. म्हणूनच सलमानने पोलिसांकडे बंदूक परवान्याची मागणी केली होती.

धमकी मिळाल्यानंतर सलमान आपल्या कुटुंबाची पूर्णपणे काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय. मिळालेल्या माहितीनुसार एका विमान तळावरून जाताना सलमान आपल्या नवीन ताफ्यासोबत दिसून आला. यावेळी सलमान आपल्या नेहमीच्या गाडीतून न आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. सलमान ज्या गटातून आला ती गाडी नवीन लँड क्रुझर असल्याचे बोलले जात आहे. दीड कोटी रुपये किंमत असलेली ही गाडी बुलेटप्रूफसह अत्यावश्यक सुविधा देणारी आहे.

कार वेबसाईट ‘कार वाले’ नुसार ही नवी कार टोयोटोची लँड क्रुझर असून तिची किंमत दीड कोटी रुपये आहे. बुलेट प्रुफ रिलायबिलीटी सह ही कार येते. गेल्याच महिन्यात सलमान खानाने मुंबईचे पोलीस कमिशनर विवेक फणसळकर यांची भेट घेऊन आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेतला आहे.

गायक सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्त्या झाल्यावर काही दिवसानी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. काळवीट शिकार प्रकरणात सलमान कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई यांच्या रडारवर असून त्यानेच सलमानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा संशय आहे.

Team Global News Marathi: