माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या बोर्डाला संतप्त शिवसैनिकांनी फासले काळे

 

मुंबई येथील दहिसर विभागातील माजी नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या आहेत. यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेनेला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. शीतल म्हात्रे या दहीसर पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका आहेत. शीतल म्हात्रे दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. शीतल म्हात्रे यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ज्या नगरसेविकेला संजय राऊतांनी अग्निकन्या असं नाव दिलं होतं. त्यादेखील आता बंडखोरांच्या गटात सामील झाल्याची भावाना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. याचा विरोध करीत वॉर्ड क्रमांक 7 च्या शाखेवर लावलेल्या फोटोंवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आहे. ज्यानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. या घडलेल्या प्रकारामुळे काही काळापर्यंत वातावरण तापले होते.

मुंबईतील आमदारांपाठोपाठ आता नगरसेवक ही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शीतल म्हात्रे यांचा एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभाग झाल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दहीसर, बोरिवली आणि मागाठाणे मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली होती. त्यानंतरही शिवसेनेत राजकीय फुट सुरुच आहे.

Team Global News Marathi: