सीएनजी आणि पीएनजी ‘इतक्या’ रूपयांनी महागलं

 

मुंबईकरांच्या खिशाला आता पुन्हा कात्री लागणार आहे. महानगर गॅस मर्यादीत कंपनीने सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असून स्थानिक पातळीवर गॅसच्या आयातीत कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे महानगर गॅस मर्यादीतने सांगितले आहे.

मुंबईतील नागरीकांना आता सीएनजी आणि पीएनजीसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. सीएनजी आता 80 रूपये प्रतीकिलोने खरेदी करावा लागेल तर पीएनजीसाठी 48.50 रुपये द्यावे लागणार आहेत. महानगर गॅस कंपनीने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी देशांतर्गत वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीवर वाढ होण्याचा निर्णय घेण्यात आलाअसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सीएनजीच्या किमतीत 4 रुपये तर पीएनजी किमतीत 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबईत सीएनजीचे दर 29 एप्रिलला वाढविण्यात आले होते. त्यावेळी 4 आणि आता पुन्हा 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नसून दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सतत चढ-उतार चालू आहे. सध्या कच्च्या तेलांच्या किमतीत घट झाली असून लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची आशा आहे.

Team Global News Marathi: