महिला पोलिसाला धक्का लागल्याचं दाखवलं तर मी राजकारण सोडेन

 

संदीप देशपांडे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर दिले होते. आमच्यावरील गुन्हा खोटा होता. खोट्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस आम्हाला शोधत होते. मीडियामधील फूटजे आमच्या वकिलांनी कोर्टात दाखवलं. त्यावरुन स्पष्ट झालं की आम्ही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही सरकारविरोधात बोलू नये म्हणून सरकारने दबाव बनण्यासाठी हे सगळं केलं. आमचा कायद्यावर आणि न्यायालयावर विश्वास होता. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला,” असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

“महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचं दाखवलं तर मी राजकारण सोडेन,” असं संदीप देशपांडे म्हणाले. तसंच ठाकरे सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप देखील देशपांडे यांनी केला. संदीप देशपांडे 16 दिवसांनी मुंबईत परत आले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले.

“माझ्याकडे एका न्यूज चॅनलचं फूटेज आहे. त्याचे स्क्रीन शॉट काढले आहेत. बोलेसे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचा महिला पोलिसाला धक्का लागला. अशाप्रकारे सरकारने पोलीस स्टेशनवर दबाव बनवून फूटेजमधले शॉट्स कट करुन काहीतरी केलं. गुन्हे दाखल करुन राजकीय सूड उगवला,” असं देशपांडे म्हणाले.

केंद्र सरकार सुडाचं राजकारण करतं असं उद्धव ठाकरे सभेत म्हणाले, तुम्ही काय करताय? महिला पोलिसाला आमचा धक्का लागल्याचं एकतरी फूटेज दाखवलं तर संदीप देशपांडे राजकारण सोडून देईन,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला का आतापर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

Team Global News Marathi: