“एकदा काय ते होऊनच जाऊ दे…”, राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचा टिझर जाहीर !

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची २१ ते २८ मे दरम्यान पुण्यात सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु ठिकाण मात्र ठरत नव्हते. सुरुवातीला सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे सभेची जागा निश्चित करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर मुळा – मुठा नदीपात्रात २१ मेला जागा फिक्स करण्यात आली. पण तिथेही पावसाचे कारण देऊन पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सभा रद्द झाल्याचे सांगितले.

आज अखेर मनसेने रविवारी पुण्यात सभा होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. शहरात गणेश कला क्रीडा मंच येथे रविवार २२ मे रोजी सकाळी १० वाजता सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे.

टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सुरुवातीला औरंगाबादच्या सभेतील एकदा काय ते होऊनच जाऊ दे… हे वाक्य घेण्यात आले आहे. तर टिझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणंही वाजत आहे. या टीझरवरून पुण्यातील सभा जोरदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या अनुषंगाने मनसेचे पुण्यातील सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत.

Team Global News Marathi: