महेश मांजरेकर यांच्या नव्या चित्रपटाला नेसरी गावकऱ्यांचा मोर्चा!

 

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बहुभाषिक चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली. यानंतर या चित्रपटाची संपूर्ण कास्ट सर्वांसमोर आणली. यावरून आता ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपट आणि महेश मांजरेकर यांच्यावर अनेकांनी टीका केली.पहिले छत्रपती संभाजीराजे यांनी ‘इतिहासाची मोडतोड करू नये, ते सहन केले जाणार नाही,’ असा इशारा दिला. तर दुसरीकडे, कोल्हापुरातील नेसरी गावातील ग्रामस्थांनी त्यांच्याविरोधात आंदोलने सुरु केली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती प्रतापराव गुजर आणि बहलोल खान यांचे युद्ध कोल्हापूरमधील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावात झाले होते. याच नेसरीमधील गावकऱ्यांनी चित्रपटामध्ये दाखवण्यात येणारी सात मराठ्यांची नावे चुकीची असल्याचा आरोप केला आहे. यावेळी ग्रामस्थांनी त्यांची खरे नावेदेखील समोर आणली आहेत.

नेसरी गावकऱ्यांनी म्हंटले की, “विसाजी बल्लाळ यांचे नाव चित्रपटात मल्हारी लोखंड असे दाखवले आहे. तर दीपोजी राऊतराव यांना चित्रपटात चंद्राजी कोठार, विठ्ठल पिळाजी अत्रे यांचे नाव जिवाजी पाटील दाखवले आहे. तसेच सिद्धी हिलाल यांचे नाव सूर्याजी दांडेकर, विठोजी शिंदे यांचे दत्ताजी पागे आणि कृष्णाची भास्कर यांचे नाव तुळजा जामकर असे दाखवले आहे.

Team Global News Marathi: