“महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं” राजू शेट्टी यांनी मांडले परखड मत

 

शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीचे नवे सरकार स्थापन झाले.महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत टीका केली होती. आता भाजप-शिंदे गट युतीचे नवे सरकार आल्यावर कोणासोबत जाणार, हे राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच महाविकास आघाडीत जाणे म्हणजे असंगाशी संग करणे होय, अशी घणाघाती टीकाही राजू शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी नक्की महाविकास आघाडी की युतीचा भाग असणार याची चर्चा सुरु होती. त्यावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजू शेट्टी यांनी कुणाशीही युती किंवा आघाडी न करता ‘एकला चलो रे’ची भूमिका त्यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीत जाणे म्हणजे असंगाशी संग करणे होय, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

निवडणुका लढवणे किंवा राजकारण करणे हा आमचा धंदा नाही. शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी, वेगवेगळ्या सभागृहात प्रतिनिधी पाठवण्यासाठी आम्ही असंगाशी संग करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यात आम्हाला चांगले अनुभव आला नाही. त्यामुळे यापुढे आम्ही महाविकास आघाडी किंवा भाजप यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतंत्रपणे दोन्ही आघड्यापासून दूर राहत कार्य करणार, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही सरकारचे १०० दिवसात परीक्षण करता येत नाही. या सरकारने आपण लोकोपयोगी सरकार असल्याची साधी चुणूकही या शंभर दिवसात दाखवलेली नाही. सरकार दहीहंडीत गोविंदा, गणपतीमध्ये डॉल्बीबाबत जी तत्परता दाखवली ती शेतकऱ्यांबाबत का दाखवत नाही, असा सवाल करत महाराष्ट्रात ऊस वगळता एकही पीक अतिवृष्टीमुळे शिल्लक राहिले नाही. मात्र कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे बोलतात, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

Team Global News Marathi: