कुलुप घेऊन जात नौटंकी का करता? पुन्हा सोमय्यांनी साधला किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाना

 

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यामधील वाद सध्या तरी थांबायचं नाव घेत नाही. सोमय्या यांनी एकीकडे किशोरी पेडणेकरांवर जोरदार टीका केलीय. तर दुसरीकडे पेडणेकरांच्या सासूचे निधन झाल्यामुळे सोमय्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई श्रीमती विजया पेडणेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

किशोरी पेडणेकर यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेल्या SRA घोटाळ्याच्या आरोपानंतर चौकशी झाली होती. किशोरी पेडणेकरांवर होणाऱ्या आरोपांमुळे वयोवृद्ध विजया पेडणेकर यांनी धसका घेतल्यामुळे हा मृत्यू झाला असा आरोप आता पेडणेकर कुटुंबीयांनी केला. यावर सोमय्यांना प्रतिक्रीया दिली आहे. कथित एसआरए घोटाळ्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय.

ते म्हणाले, किशोरीताईंना ‘झोपू’ ची नोटीस मिळाली आहे का? पेडणेकरांच्या ताब्यात गाळे आहे, त्यासाठी एसआरएनं नोटीस पाठवली आहे. गंगाराम बोमाया वडलाकोंडा यांना एसआरएनं लिहीत विचारलंय की, तुम्ही किशोरी पेडणेकरांना राहायला जागा दिली. सोमय्या पुढे म्हणाले, माझ्या तक्रारी उद्धव ठाकरेंनी दाबल्या होत्या. शिंदे सरकारनं आता सांगितलंय कायदेशीर जे असेल ते करा. तुम्ही २०१७ च्या शपथपत्रात लिहिलंय की, तुम्ही तिथे राहात होत्या. कुलुप घेऊन जात नौटंकी का करता? असा सवाल सोमय्या यांनी पेडणेकरांना विचारलाय. तसेच संजय अंधारी यांना हजर करा, आव्हानही सोमय्या यांनी पेडणेकर यांना दिलंय

 

Team Global News Marathi: