महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या नियोजनावर अजित पवार यांनी साधला निशाणा

 

ज्येष्ठ निरुपणकार, थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या गेलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती यावेळी उष्माघाताचा त्रास झाल्यानं अनेक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यानंतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची वेळ योग्य ती ठरवायला हवी होती. भर दुपारी कार्यक्रम घेणं चुकीचं होतं.

कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्यानंतरही असं घडायला नको होतं अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. अजित पवार म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही कार्यक्रमाच्या तयारीचा दोन-तीन वेळा आढावा घेतला होता. सरकारी कार्यक्रम होता. त्यासाठी जवळपास १४ कोटी रुपये खर्च केले. आजपर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्काराला इतकी मोठी रक्कम खर्च केली गेली नाही. पण इतका खर्च केल्यानंतरही असा प्रकार घडायला नको होता. बस, गाड्या मोठ्या प्रमाणावर होत्या. कार्यक्रमाच्या वेळेवरूनही अजित पवार यांनी राज्य सरकारला सुनावले.

सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. जेव्हा एखादा कार्यक्रम घेतला जातो तेव्हा तुम्ही जी वेळ सुचवलीत की ती वेळ आताच्या वातावरणात योग्य नाही. ती चार ती पाचच्या सुमारास असायला हवी होती. पुरस्कार देणाऱ्यांनी योग्य वेळ सांगायची असते असं ते म्हणाले. उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू, राज्य सरकारकडून मदत जाहीर आकडा लपवण्यात अर्थ नाही उष्माघाताचा त्रास नेमका किती लोकांना झाला, मृ्त्यू किती झाले याबाबतच्या आकडेवारीबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आकडे लपवायचे नाही. जे काही घडेल ती वस्तुस्थिती लोकांना सांगायची. एमजीएम पनवेल, वाशी, डीवाय पाटील आणि टाटा हॉस्पिटलमध्ये रुग्ण आहेत. आधी संख्या खूप मोठी होती.

Team Global News Marathi: