कर्नाटकात भाजपाची चिंता वाढली, येन निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे अनेक नेते बंडखोरीच्या तयारीत

 

कर्नाटक | कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून अनेक पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे तसेच सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने सुद्धा उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत मात्र दुसरीकडे या यादीत अनेकांची नवे डावलल्यामुळे भाजपा मध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अशातच आता निवडणूक तोंडावर आली असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. तडकाफडकी राजीनामा कर्नाटक भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे, भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

जगदीश शेट्टर यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जगदीश शेट्टर यांनी बंडखोरी केल्यानं याचा फटका या निवडणुकीत भाजपला बसणार का हे पहावं लागणार आहे. भाजपची प्रतिक्रिया दरम्यान माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पक्ष आणि आमदारकीचा राजीनाम देऊन, पक्षाच्या हितापेक्षा त्यांनी स्वतःला निवडल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी निवडणूक लढवणार दरम्यान दुसरीकडे गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढण्याचा निर्णय घेतला. या धक्क्यातून सावरून राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कर्नाटकमध्ये चाळीस जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. या निवडणुकीसाठी वीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

Team Global News Marathi: