माध्यमांशी बोलू नका, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा शिवसेना आमदारांना आदेश

 

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला असून शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरात मध्ये असल्याचे वृत्त समजते.

एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना आदेश दिला आहे. माध्यमांशी बोलू नका, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना दिला असल्याचे समोर येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच १३ आमदार असल्याची माहिती होती. मात्र आता आमदारांसोबतच ठाकरे सरकारमधील ३ मंत्री देखील नॉट रिचेबल असल्याचे कळत आहे. यामध्ये संदीपान भूमरे अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई आणि स्वता एकनाथ शिंदे यांचा समावेश असल्याचं समोर येत आहे. हे सर्व आमदार आणि मंत्री हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

Team Global News Marathi: