राज्यात लवकरच परिवर्तन, साताऱ्यात कंदी पेढे वाटून शिवेंद्रराजेंचंसूचक वक्तव्य

 

सातारा | राज्यात घडलेल्या धक्कादायक राजकीय घडामोडींसंदर्भात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याने भाजप नेत्यांकडून अनेक कमेंट केल्या जात आहेत. अशातच शिंदे यांनी आपला प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासंवर मांडला आहे.

मात्र दुसरीकडे भाटिया जनता पक्षाच्या नेत्यांकडून ट्विटरच्या माध्यमातून आणि माध्यमांना प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टिका करण्यात येत आहे. तसेच, लवकरच राज्यात सरकार बदलणार असल्याचेही भाकीत केले जात आहे. साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

राज्यात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या योग्या नियोजनामुळे पुढील काळात राज्यामध्ये परिवर्तनाची नांदी पाहायला मिळेल. प्रामुख्याने महाविकास आघाडीत असलेली धुसफूस या सर्वांला कारणीभूत असल्याचे सांगत राज्यामध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असे भाकीत देखील सातारचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात बोलताना केले आहे.

विधान परिषदेमध्ये मिळालेल्या विषयाचा आनंद उत्सव साताऱ्यातील मोती चौक येथे कंदी पेढे वाटप करुन साजरा करण्यात आला. त्यावेळेला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे माध्यमांशी बोलत होते. सध्या राज्यात घडलेल्या राजकीय बंडावर त्यांनी भाष्य केलं आहे.

Team Global News Marathi: