मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरातनंतर ‘या’ राज्यांत ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त

 

मुंबई | संपूर्ण देशात चर्चेत असलेला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाने प्रेक्षकांना सुद्धा चित्रपटग्रहाकडे खेचून घेतले आहे आता हा सिनेमा देशातील अनेक राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे. गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेशनंतर आता कर्नाटक आणि उत्तरप्रदेशमध्ये हा सिनेमा करमुक्त झाला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट करत ‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा करमुक्त केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे,”सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी आणि अधिकाधिक प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहवा यासाठी आम्ही हा सिनेमा करमुक्त केला आहे” अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिलेली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद पवार यांनीदेखील ‘द कश्मीर फाइल्स’या सिनेमाला पाठिंबा दिला आहे. गोव्यात जास्तीत जास्त स्क्रीन्सवर हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे. तसेच लवकरच हा सिनेमा गोव्यातदेखील करमुक्त करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी भाजपा आमदाराने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Team Global News Marathi: