हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची भाजपची परंपरा, नाना पटोलेंचा टोला

 

मुंबई | सोमवारी सभागृहात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव अमजद खान ठेवण्यात आल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले. त्यानंतर हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची भाजपची परंपरा असल्याचे म्हणत मी कुणाची जात काढत नाही. पण मला अमजद खान का देण्यात आलं? असा सवाल पटोले यांनी केला आहे.

 

यासांदर्भात प्रसार माध्यमांशी बोलत असतांना नाना पटोले म्हणाले की,’राज्याच्या हितासाठी सर्व आमदारांना निवडून पाठवतात. परंतु लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे काम फडणवीसांच्या काळात झाले असेल तर त्याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.’ तसेच हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची भाजपची परंपरा राहिलेली आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, नाना पटोले यांचे नाव अमजद खान. बच्चू कडूंचे निजामुद्दीन बाबू शेख. संजय काकडे यांचे तरबेज सुतार. तसेच आशिष देशमुख यांचे नाव रघू चोरगे. तर आशिष देशमुख यांचे नाव ठेवलं हिना महेश साळुंके ठेवण्यात आल्याचे वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले. या आरोपांमुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

 

Team Global News Marathi: