‘लव्ह सुलभ प्रिंयदर्शन जाधव यांचा मराठी चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई / मनोरंजन : लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून आपल्या भूमिका चोखपणे निभावणारे प्रिंयदर्शन जाधव पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळाले आहेत, आता लवकरच त्यांचा लव सुलभ मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या चित्रपटाची त्यांनी घोषणा केली आहे. तसेच या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचे शूटिंग ठाणे येथे होणार असून ठाण्याचे महापौर नरेश म्हसके आणि चित्रपटाचे निर्माते प्रभाकर परब यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर मंडळी उपस्थित होते. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

देवी सातेरी प्रॉडक्शन्सच्या प्रभाकर परब यांनी ‘लव सुलभ’ चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्मिती स्वरूप स्टुडिओजच्या आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, विशाल घाग यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव याचे असून छायांकन केदार गायकवाड करणार आहेत तर सतीश चिपकर कलादिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत.

Team Global News Marathi: