बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा सवाल

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधी बाकावर बसलेल्या भारतीय जनता पक्षाने विविध मुद्द्यावरून आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात मनसुख हिरेन प्रकरण, वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या आणि सचिन वझे प्रकरणावरून आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असताना बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? असा सवाल भाजपाने विचारला आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. “२००७ मध्ये बजाज कंपनीला MIDC ने दिलेल्या २०० एकर भूखंडावर कंपनीने २०२० पर्यंत कोणतेही काम केले नसल्याने कंपनीला १४३ कोटिंचा दंड ठोठावण्यात आला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेऊन हा दंड अवघा २५ कोटी केला आहे का? असा सवाल मी विधानसभेत उपस्थित केला…” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत बजाज कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडावर आकारण्यात आलेल्या दंडाचा उल्लेख करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाण साधला.

Team Global News Marathi: