लॉकडाऊन दरम्यान उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून होणार लवकरच मुक्तता

 

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन देशासह महाराष्ट्रातही कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतरही संचारबंदी, रात्रीची संचारबंदी अशा स्वरूपात निर्बंध लावण्यात आले होते. या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असून, लवकरच याबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली.

राज्यात लॉकडाऊन लागू असताना, त्याचबरोबर नंतरच्या काळात संचारबंदी असताना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थी, नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे रद्द करण्याचा विचार राज्य सरकारच्या विचाराधीन असून लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली. “कोरोना लॉकडाऊनच्या काळात कलम १८८ अंतर्गत विद्यार्थ्यांसह नागरिकांवर हजारो गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात सरकार काही पावलं उचलणार आहेत का? “कोरोनाच्या काळात संचारबंदी आणि इतर स्वरूपाची बंदी घातलेली गेली होती. तसेच या काळात विद्यार्थी आणि नागरिकांवर १८८ अंतर्गत काही गुन्हे दाखल झालेले आहेत.

आता हे सर्व गुन्हे पाठीमागे घेण्याचा गृहविभागाचा तत्त्वतः निर्णय झालेला आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर जाऊन हा प्रस्ताव मांडू आणि हे गुन्हे घेतले जातील. कारण विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जाताना बऱ्याच प्रकारच्या अडचणी सामना करावा लागतो. तो करावा लागू नये, असाच आमचा प्रयत्न असेल”, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: