डिजिटलच्या माध्यमातून लोन घेताय तर सावधान, खेडमध्ये महिला आणि तरुणीसोबत घडला

 

डिजिटल अ‍ॅपद्वारे कर्ज घेणाऱ्या तरुण तरुणी, महिला यांचे नग्न आणि अश्लील फोटो क्रॉप्ट करून लाखो रुपये उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी घडल्याचे समोर आला आहे.एवढंच नाहीतर पैसे न देणाऱ्या अनेक कर्जदाराचे फोटो व्हायरल केले जात आहे. अनेक तरुण तरुणी, गृहिणी महिला या प्रकाराला बडी पडल्या आहे.

ऑनलाईन अ‍ॅपद्वारे कर्ज घेताय तर सावधान. मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन लोन घेणाऱ्या कर्जदारांना विचित्र पद्धतीने ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचे समोर येत आहे.कर्ज फेडले तरी, पैशांची जादा मागणी केली जात आहे आणि पैसे देण्यास नकार देणाऱ्या कर्जदाराचे अश्लील नग्न फोटो तयार करून त्या कर्जदाराच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील त्याच्या संपर्कातील तसंच ओळखीच्या व्यक्तींना पाठवले जात आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तरुण आणि तरुणी या प्रकाराला बळी पडले असून एका तरुणाने पुढे येत याबाबत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक तरुण बेरोजगार झाले असून अनेक व्यवसाय डबघाईला आलेले पाहायला मिळत आहे. असे लोक फोन वर सतत येणाऱ्या झटपट लोन देणाऱ्या ऑनलाईन मोबाईल अ‍ॅपद्वारे 5 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेत आहेत.

अगदी सहज आणि अवघ्या काही मिनिटात केवळ एक सेल्फी आणि आधारकार्डच्या माध्यमातून अशा तरुणांना काही क्षणात कर्ज दिले जात आहे. अनेकांनी हे कर्ज फेडल्यानंतर कर्ज देणाऱ्या फायनान्सकडून कर्जदारांना मॅसेजद्वारे आणि व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून जादा पैशांची मागणी केली जात आहे. त्यांच्या मागणी प्रमाणे पैसे न देणाऱ्यांना ऑनलाईन कर्जाची मागणी करते वेळी काढलेल्या सेल्फीच्या फोटोवरून अश्लील आणि नग्न फोटो तयार करून पैसे द्या नाहीतर हे फोटो तुमच्या सर्व नातेवाईकांना, मित्रांना आणि संपर्कातील सर्व लोकांना पाठवू, समाजात बदनामी करू’ अशा धमक्या दिल्या जात आहेत सध्या या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Team Global News Marathi: