जीव वाचवण्यासाठी सण-वार काही काळ बाजूला ठेवू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गोविंद पथकांना आवाहन

 

मुंबई | दहीहंडी सण थाटामाटात साजरा करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध विरोधी पक्षाने घेतली. त्यावर जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी संयमी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली.

मुंबईत जरी निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरीही सणांवर अजूनही बंदीच आहे. दहीहंडी, गणेशोत्सवासाठी या सणांसाठी अवघे काही दिवस उरले असताना सणांसाठी निर्बंधांत सूट देण्याची मागणी करण्यात येत आहे. येत्या ३१ ऑगस्टला दहीहंडी उत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील प्रमुख गोविंदा पथकांसोबत एक बैठक आयोजित करण्यात अली होती या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सणांसंबंधी आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत… पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील किंबहुना दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. यावर आता विरोधक या भूमिका घेतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: