दहीहंडीला परवानगी न दिल्यास सरकार विरोधात आंदोलन करणार, आशिष शेलार यांचा इशारा

 

चंद्रपूर | जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी संयमी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. मात्र आता मुख्यमंत्री ठकरे यांच्या या भूमिकेवर मनसेसह भजरतीया जनता पक्षाने घणाघाती टीका केली आहे.

दोन डोस झालेल्या आणि प्रमाणपत्र असलेल्यांना पारंपारिक पद्धतीने दहीहंडीचा उत्सव करु द्या अशी मागणी भाजन नेते आशीष शेलार यांनी केली आहे. कमी गर्दीच्या आणि कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी दिली नाही तर सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही आशिष शेलार यांनी दिली आहे. भाजप नेते आशिष शेलार हे दोन दिवसीय सोलापूर दौऱ्यावर असून भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

तसेच चंद्रपूर इथं झालेल्या सामूहिक मारहाणीबद्दलही आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचा काळामध्ये लोकांचे जीव असुरक्षित असून सुरक्षा फक्त नेत्यांच्या मुलांची वाढली आहे. महिलावर, बालकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पोलिसांवर सरकारचा वचक नाहिए. पोलिसांच्या आपापसातील गटबाजीमुळे ते आतून पोखरून गेले आहेत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेण्याची हात जोडून विनंती असं ते यावेळी बोलले.

Team Global News Marathi: