देशाचे ‘इंडिया’ हे नाव बदलून ‘भारत’ करण्याची इच्छा कंगनाने केली व्यक्त

 

मुंबई | आपल्या सतत वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा एकदा अजब विधान केले आहे. चक्क तिने यावेळी देशाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. वादग्रस्त विधानामुळे काही दिवसांपूर्वी तिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. त्यांनतर इंस्टाग्राम आणि कू अ‍ॅपवरून टी आपली मते मांडत असते.

कंगनाने नुकतीच तिच्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमुळे कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाचे नाव बदलण्याची गरज असल्याचे कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. देशाचे ‘इंडिया’ हे नाव बदलून ‘भारत’ असे करण्याची इच्छा कंगनाने व्यक्त केली आहे. ब्रिटीशांनी ‘इंडिया’ हे नाव ठेवले असून ते गुलामगिरीची आठवण करून देणारे असल्याचेही ती म्हणाली. कंगनाने यावेळी इंडिया आणि भारत या शब्दांचा अर्थ तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट केला आहे.

पुढे आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते की, जर असेच आपण पाश्चिमात्य देशाच्या नावीची कॉपी बनून राहिलो, तर आपला देश कधीच प्रगती करू शकणार नाही. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्राचीन ज्ञानाची मदत घेवून विकास करणे गरजेचे आहे. तेव्हाच भारत पुढे जाईल, जेव्हा आपण आपली प्राचीन सभ्यता आणि संस्कृती यावर विश्वास ठेवून त्या मार्गाने पुढे जाऊ, असे म्हणत कंगनाने सर्वांनी योग, वेद आणि गीता यांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे म्हणाली आहे.

Team Global News Marathi: