साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे ; वाचा विश्वस्त मंडळाची यादी

साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे ; वाचा विश्वस्त मंडळाची यादी

ग्लोबल न्यूज:

शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कोपरगावचे राष्ट्रवादीचे युवा आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या माजी आमदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने शिर्डी संस्थानवर नव्याने विश्वस्त मंडळ नियुक्त केले आहे. विश्वस्त मंडळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, तर शिवसेनेचे पाच सदस्य असतील. तर पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोणाच्या वर्णी लागणार यावरून कॉँग्रेस- राष्ट्रवादीत चर्चा सुरू होती. या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या नावास दाखविले आहे. यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंद साजरा केला.

आशुतोष काळे यांचा परिचय

आशुतोष काळे हे ३५ वर्षांचे आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव राष्ट्रवादीचे ते युवा आमदार आहेत.माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू आहेत.

त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची जबाबदारी आहे.आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ वाटप

अध्यक्षपद : राष्ट्रवादी

उपाध्यक्ष : शिवसेना

अध्यक्ष आशुतोष काळे

उपाध्यक्ष रवींद्र मिर्लेकर

राष्ट्रवादी काँग्रेस

आशुतोष काळे

जयंत जाधव

महेंद्र शेळके

सुरेश वाबळे

संदीप वर्पे

अनुराधा आदिक

काँग्रेस

डॉ एकनाथ गोंदकर

डी पी सावंत

सचिन गुजर

राजेंद्र भोतमागे

नामदेव गुंजाळ

संग्राम देशमुख

शिवसेना

रवींद्र मिर्लेकर

राहुल कनाल

खा. सदाशिव लोखंडे

रावसाहेब खेवरे (एक नाव प्रलंबित)

ग्लोबल न्युज नेटवर्क: