जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व; कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस

आजचे पंचांग. वार – गुरुवार 18 मार्च 2021

शुभाशुभ विचार — 07 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.OO
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – भरणी 10.34 पर्यंत नंतर कृत्तिका.
चंद्र राशी – मेष 17.22 पर्यंत नंतर वृषभ.

आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्च वाढत असला तरीही पैसा कमी पडणार नाही. आज भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

वृषभ – ( शुभ रंग- मरून)

आज तुमसे मनोबल उत्तम राहील तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल तब्येत ठणठणीत राहील. एखादी हरवलेली वस्तू आज दुपारनंतर सापडेल.

मिथुन – ( शुभ रंग- आकाशी)

नोकरीत तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होती. आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकुन घेतलेली बरी, नंतर थोडी मानसिक अस्वस्थता राहील.

कर्क – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज काही मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. संध्याकाळी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल.

सिंह – ( शुभ रंग- मोरपंखी)

उद्योगधंद्यात स्पर्धा वाढलेली असेल. जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या बातम्या येतील. अधिकारात वृद्धि होईल. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षीत होतील.

 

कन्या – ( शुभ रंग- पिस्ता )

आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडू शकतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल. आज दानधर्म कराल.

तूळ – ( शुभ रंग- क्रीम)

आज तुमच्या मनात काही नकारात्मक विचार येतील. महत्वाच्या चर्चा बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या. तरुण मंडळींना घरातील थोरांचे विचार पटणार नाहीत. आज कोणत्याही प्रकारचे धाडस नको.

वृश्चिक – ( शुभ रंग – लाल)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा विरोध मावळेल. तुम्ही केलेले कष्ट कारणी लागतील. कार्यक्षेत्रात काही नव्या संधी चालून येतील. महत्वपूर्ण निर्णय दिवसाच्या उत्तरार्धात घ्या.

धनु – ( शुभ रंग- केशरी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण जाणवेल. काही जुनी दुखणी डोके वर काढणार आहेत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही येणी असतील तर मागायला लाजू नका.

मकर – ( शुभ रंग- जांभळा)

लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. गृहिणींना घर सजावटीच्या काही वस्तू आकर्षित करतील. आज एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ –( शुभ रंग- चंदेरी)

कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. मुले आज तुमच्या आज्ञेत असतील. गृहिणींना सासुबाईं कडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतील. आज चर्चेपेक्षा कृतीस प्राधान्य द्या.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. आज तुमची आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. बराचसा वेळ आज घराबाहेर जाईल.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: