कृषीपंप वीज जोडणी धोरणाला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद, मंत्री नितीन राऊत यांची माहिती

नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाला राज्यातील तमाम शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देत असून आतापर्यंत ५.८२ लाख शेतकऱ्यांनी थकीत कृषीपंप विजबिलापोटी ५११ कोटी २६ लाख इतकी रक्कम अदा केली आहे. तसेच प्रलंबित वीजजोड प्रकरणी तात्काळ कार्यवाही आणि थकीत वीजबिल वसुलीसाठी भरघोस सवलत देण्याच्या या नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाची संकल्पना मंत्री नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून पुढे आली आहे.

कृषी ग्राहकांना सवलतीसह वीजबिल वसुलीसाठी कंपनीकडून ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत भरणा करण्यात आलेल्या ५११ कोटी २६ लाख रकमेवर २५६ कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. एकूण ५,८२,११४ शेतकऱ्यांनी ही थकबाकी भरली आहे.

राज्यातील ४४ लाख कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ७८९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणानुसार विलंब आकार आणि व्याजातील एकूण सूट १५ हजार ९३ कोटी रुपये इतकी असून सुधारित होणारी थकबाकी ३० हजार ६९६ कोटी रुपये होते. पहिल्या वर्षी भरल्यास सुधारित मूळ थकबाकीपैकी अर्धी म्हणजेच सुमारे 15 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम माफ होणार आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून ऊर्जांमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत.

Team Global News Marathi: