अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची, रश्मी ठाकरेंची नाही राऊतांच्या भाजपाला इशारा

 

मुंबई | मुखपत्रातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भोकं पडलेला फुगा, असा टोला शिवसेनेने राणे यांना लगावला होता. याप्रकरणी सामना वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी थेट भाजपाला इशारा दिला आहे.

सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे. त्या अग्रलेखाची जबाबदारी हा संजय राऊत घेतोय’, असं राऊत यांनी बोलून दाखविले होते. मागच्या तीन ते चार दिवसांपासून शिवसेना-नारायण राणे यांच्यातला वाद चांगलाच चिघळला आहे. दोन्ही बाजूने टीकेची झोड उठतीय. आरोप प्रत्यारोपांची राळ उडतीय. या सगळ्यात एकमेकांना लक्ष्य करताना शेलक्या शब्दांचा प्रयोग होत आहे. राणे कुटुंब आणि सामना अग्रलेखातून देखील असे शब्दप्रयोग होत आहेत. परंतु राऊतांचे अग्रलेखातील घाव विरोधकांच्या वर्मी लागत आहेत.

याच भाषेवर आक्षेप नोंदवत सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात भाजपच्या तक्रार नोंदविण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचविषयी आज संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं असता राऊतांनी आक्रमक उत्तर दिलं. सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे…. त्या अग्रलेखांची जबाबदारी या संजय राऊतची… रश्मी ठाकरेंची नाही, असं राऊत म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या दिवसात भाजपा-शिवसेना वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे,

Team Global News Marathi: