केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे. राणेंची जन आशिर्वाद यात्रा सुरु आहे. उद्या ते या यात्रेसाठी जाणार आहेत. मात्र त्यापूर्वी रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात पोहोचले आहेत. सध्या त्यांची रुग्णालयात रुटिंग चेकअप सुरु असून अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

नारायण राणे यांनी मुख्यमनातरी उद्धव ठाकरेंविरुद्ध अपशब्द काढल्याने त्यांना अटक करण्यात आली होती, मात्र अवघ्या काही तासातच त्यांना जमीनही मिळाला . त्यांच्या टाकेचं दरम्यान त्यांची तब्येत बिघडलेली असल्याचं सरकारी डॉक्टरांनी सांगितलं होतं. राणेंना बीपी आणि शुगरचा त्रास आहे. त्याच्यावरील उपचार ते घेत आहेत. नारायण राणे यांना अटक करण्यात अली आहे. मात्र, त्यांची प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे तसेच रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. प्रकृती अस्वास्थायमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. सध्या त्यांना अटक झाली असली तरी डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली आहे.

सॅच्युरेशन नॉरमल आहे, बीपी वाढलेला आहे, वय पाहता बीपी वाढला आहे, ते डायबिटीजचे पेशंट आहेत, ईसीजी आणि अॅडमिशन आवश्यक आहे. बीपी वाढल्यामुळे राणेंना रुग्णालयात अॅडमिट करावं लागेल, त्यानंतर पुढील ट्रीटमेंट द्यावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Team Global News Marathi: