आमिरची मुलगी आयरा लवकरच मराठमोळ्या नुपूरशी बांधणार लग्नगाठ

 

अभिनेता आमिर खानच्या मुलीचं सध्या प्रत्येकजण अभिनंदन करत आहेत. आयरा खान आता सिंगल नाहीये. आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबतचं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. आयराने नुपूरसोबत साखरपुडा केला आहे. त्यांचा साखरपुडा शांततेत नाही तर तुफानी झाला. या स्टारकिडने तिला प्रपोजल केल्याचा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे.

आयर्न मॅन इटली शोमध्ये नुपूर शिखरेने आयराला प्रपोज केले. व्हिडिओमध्ये फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे रेसच्या पोशाखात गर्लफ्रेंड आयराकडे येताना दिसतो. तो आयराचं चुंबन घेतो, मग नुपूर गुडघ्यावर बसून फिल्मी अंदाजात अंगठी काढतो आणि लेडीलव्ह आयराला घालतो. नुपूरचं प्रपोज पाहून आयरा भलतीच आनंदी होते आणि ती लगेच त्याला होकारही देते. यानंतर नुपूर तिला अंगठी घालतो.

आयरा आणि नुपूरचा यांच्यातलं बॉण्डिंग पाहून तिथे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या. आयरा आणि नुपूरच्या साखरपुड्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सर्वजण या जोडप्याचं अभिनंदन करत आहेत. हा सुंदर व्हिडिओ इन्स्टावर शेअर करताना आयराने लिहिले- ‘पॉपोय- ती हो म्हणाली. आयरा- हाहाहा, मी हो म्हणाले.

Team Global News Marathi: