तुम्हाला बीकेसी मैदानावर परवानगी कशी मिळाली? हायकोर्टाचा शिंदे गटाला सवाल

 

दसरा मेळाव्यावरून सध्या राडा सुरु आहे, त्यात यंदाच्या मेळाव्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार आहेत. पण दसरा मेळ्यावा शिवजी पार्कमध्ये कोण घेणार? याचा वाद हायकोर्टात पोहचला आहे. एकनाथ शिंदे गट, उद्धव ठाकरे आणि मुंबई मनपामार्फत तिन्ही बाजू हायकोर्टानं ऐकून घेतल्या आहेत. तुम्हाला बीकेसी मैदानावर परवानगी कशी मिळाली? असा प्रश्न यावेळी हायकोर्टानं शिंदे गटाला विचारला.

तसेच इतर मुद्द्यावर युक्तीवाद न करता शिवाजीपार्क आणि दसरा मेळाव्यावर युक्तिवाद करा, अशी सूचनाही हायकोर्टाकडून देण्यात आली.आम्हीच खरी शिवसेना, त्यामुळे शिवजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला होता. यावेळी हायकोर्टाकडून सदा सरवणकर यांची हस्तक्षेप करणारी याचिका फेटाळली. एकप्रकारे हा शिंदे गटाला धक्का मानला जातोय. निवडणूक आयोगाच्या याचिकेप्रमाणे युक्तिवाद करु नका, असेही शिंदे गटाला हायकोर्टाकडून बजावण्यात आले.

बीकेसी मैदानावर ठाकेर गटाच्या वकिलानं युक्तीवाद केल्यानंतर हायकोर्टानं शिंदे गटाच्या वकिलांना तुम्ही इतर कोणत्या मैदानावर परवानगी मागितली होती का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचि प्रक्रिया काय होती? असा प्रश्नही कोर्टानं शिंदे गटाला विचारला. यावर शिंदे गटाकडून आम्ही रितसर अर्ज केला होता, ज्याप्रमाणे शिवाजी पार्कसाठी अर्ज केला होता, तसाच अर्ज बीकेसीमधील मैदानासाठी केला होता, असा युक्तीवाद करण्यात आला. आम्ही पहिल्यांदा याचिका दाखल केली होती, त्यामुळे आम्हाला परवानगी मिळाली, असेही कोर्टाला सांगण्यात आलं.

Team Global News Marathi: