लता मंगेशकरांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आता होणार पूर्ण; कुटूंबियांची घोषणा

 

मुंबई | ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं फेब्रुवारीमध्ये निधन झालं होतं. त्यांच्या जाण्याने आजही अनेकांना अश्रू अनावर होतात. आज त्या भलेही आपल्यात नसल्या तरीही, आपल्या मधुर आवाजात गायलेल्या हजारो गाण्यांमधून त्या कायम आपल्या हृदयात राहतील. लता मंगेशकर लोकांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेत असत.

संगीत क्षेत्रातील किंवा देशातील कोणत्याही आपत्तीत मदत करण्यास त्या सदैव तत्पर होत्या. लता मंगेशकर यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता. त्या या जगात असताना हा प्रोजेक्ट सत्यात उतरू शकला नाही. मात्र आज त्यांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेत त्यांचं हे स्वप्न अखेर पूर्ण केलं आहे. त्यामुळे दीदींचे चाहते फारच आनंदी आहेत. लता मंगेशकर यांच्या कुटुंबाने गुरुपौर्णिमेनिमित्त नाशिकमध्ये ‘स्वर माऊली’ फाऊंडेशन सुरू केलं आहे.

मंगळवारी लता मंगेशकर यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या या ड्रीम प्रोजेक्टची माहिती देण्यात आली आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवर लतादीदींचा एक फोटो शेअर करत ‘स्वर माऊली’ फाऊंडेशनबद्दल माहिती देण्यात आली आहे. ‘स्वर माऊली हा भारतातील गानकोकिळा लता मंगेशकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून संगीत आणि परफॉर्मिंग आर्ट्स, सिनेमा आणि थिएटर या क्षेत्रातील लोकांना मदत केली जाणार आहे. वृद्धाश्रम बांधणे हे या फाउंडेशनचं मुख्य ध्येय आहे.

गुगल मॅपकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख; आता MIM करणार तक्रार

एकनाथ शिंदेसाठी प्रसिद्ध वकील हरीष साळवे मैदाना, कोर्टात मांडणार बाजू ?

Team Global News Marathi: