कोल्हापुरात दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे पुन्हा नवे आव्हान

 

शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेल्याने जिल्ह्यात पक्षाला मोठा हादरा बसला. या दोन्ही नेत्यांच्या घराण्याची राजकीय वाटचाल मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच झाली. शिवसेनेच्या धनुष्यबाणामुळेच त्यांना खासदारकी मिळाली परंतु एकाचवेळी दोन्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांना राम राम केल्याने ठाकरे यांच्यासमोर राज्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातही पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे आव्हान असेल.

शिवसेनेला या दोन्ही जागांसाठी ताकदीचे उमेदवार शोधावे लागतील ते या घडीला तरी पक्षाकडे नाहीत. पक्षाकडे आज एकही आमदार नाही. एकमेव आमदार प्रकाश आबिटकरही शिवसेनेसोबत गेले आहेत. महाविकास आघाडी म्हणून लढायचा निर्णय झाल्यास कोल्हापूरच्या जागेवर राष्ट्रवादीही दावा सांगू शकते. कारण मूळ ही जागा त्याच पक्षाची आहे. मंडलिक-माने हे दोघेही शिंदे गटातून भाजपचे उमेदवार ठरले तर मूळच्या भाजपच्या नेत्यांना व मतदारांनाही ते कितपत रुचेल, हा प्रश्न आहेच.

हातकणंगले मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी तयारी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही तिथे रिंगणात असतील. या मतदार संघातीलही शिवसेनेचे एकमेव सहयोगी आमदार व माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेपुढचे आव्हान या मतदार संघातही खडतर आहे.

लता मंगेशकरांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आता होणार पूर्ण; कुटूंबियांची घोषणा

गुगल मॅपकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख; आता MIM करणार तक्रार

Team Global News Marathi: