लालसिंग चड्ढा’चं कौतुक करताच जितेंद्र आव्हाडांना केलं नेटकऱ्यांनी ट्रोल अखेर ट्विट केलं डिलीट

 

अभिनेता आमीर खान याचा बहुप्रतिक्षित लालसिंग चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला. चित्रपट रिलीज व्हायच्या आधीपासूनच सोशल मीडियावर बॉयकॉट लालसिंग चड्ढा अशी मोहीम सुरू झाली होती.चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे प्रॉड्युसरना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला. लालसिंग चड्ढा बाबत अभिनेत्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी स्वत:चं मत मांडलं.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवरून लालसिंग चड्ढा चित्रपटाचं कौतुक केलं होतं, पण चुकीचं ट्वीट केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना ट्रोल करण्यात आलं, यानंतर त्यांनी हे ट्वीट डिलीट केलं. ‘भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या काश्मीर फाईल्स पेक्षा त्यांनी बहिष्कार घातलेल्या लालसिंग चड्ढाने जास्त पैसा कमावला.

7.5 दशलक्ष डॉलर, म्हणजे साधारण 6 हजार कोटी रुपये, भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे,’ असं ट्वीट करत आव्हाडांनी फेक बॉयकॉट असा हॅशटॅग वापरला. जितेंद्र आव्हाडांनी हे ट्वीट केल्यानंतर 7.5 दशलक्ष डॉलर म्हणजे 6 हजार कोटी रुपये नाही तर 60 कोटी रुपये होतात. बॉलिवूडच्या सगळ्यात यशस्वी चित्रपटालाही 6 हजार कोटी रुपयांचा गल्ला जमवता आलेला नाही, असं म्हणत अनेकांनी आव्हाड यांची ही चूक लक्षात आणून दिली. यानंतर काही वेळाने जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं हे ट्वीट डिलीट केलं.

Team Global News Marathi: