मढ मधील कथीत स्टुडिओ घोटाळा, सोमय्यांकडून पाहणी

 

मुंबई | मढ येथील एक हजार कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्यांची भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेते गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर आणि इतर काही पदधिकारी यांनी आज पाहणी केलीय. कथित स्टुडिओ घोळाल्यावरून किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, सीआरझेड नियमांचे येथे उल्लंघन झालंय.सहा महिन्यांची तात्पुरता सेट लावण्याची परवानगी असताना इथलं बांधकाम आहे तसचं कसं राहिलं? हा प्रश्न उपस्थित १००० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. मढ मार्वे परिसरात पाच स्टुडिओंचा सेट आहे. या परिसरात स्मशान भूमी उभारण्याची परवागणी देण्यात आली नाही. मग स्टुडिओ कसे उभारले गेले? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच याच मुद्द्यावरून अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. २०२१ च्या जुलै महिन्यात आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी या परिसराची पाहणी केली होती. तेव्हा सहा महिन्यांची परवानगी संपलेली होती. २०१९ जुलैमध्ये येथे कुठंलही बांधकाम नव्हतं. पण रातोरात हे बांधकाम झालं. २०२१ मध्ये परवानगी संपलेली असताना आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या पाहणीनंतर हे सेट तसेच ठेवले गेले. कोणतंही पाडकाम करण्यात आलं नाही. आणि हे तात्पुरतं बांधकाम नसून पक्क बांधकाम आहे, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: