अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दीक जोशी मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये लग्नबंधनात अडकले 2 डिसेंबर 2022 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. आता अक्षया आणि हार्दिक लग्नानंतरचा पहिला सण साजरा करणार आहेत. अक्षया आणि हार्दिक आता मकरसंक्रांत साजरी करणार आहेत. त्यांचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. दोघेही संक्राती स्पेशल काळ्या कपड्यात सजले आहेत. अक्षयाने काळी साडी, नाकात नथ तर हार्दिकने देखील काळा कुर्ता असा पोशाख केला आहे.
विशेष म्हणजे या दोघांच्या पहिला सण कसा साजरा होणार हे पाहण्याची संधी देखील प्रेक्षकांना मिळणार आहे. अक्षया आणि हार्दिक झी मराठीवरील लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दोघेही यामध्ये विविध मजेशीर खेळ खेळतांना दिसून येणार आहेत. या एपिसोडमध्ये हार्दिक आणि अक्षयाचा संपूर्ण परिवार देखील सहभागी होणार आहे.
हा एपिसोड दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होणार आहे. आता लग्नानंतर दोघांनाही पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी यांचे चाहते प्रचंड उत्साही आहेत. तुझ्यात जीव रंग या मालिकेमध्य या दोघांनी एकत्र काम केले होते मात्र मालिका संपल्यानंतर या दोघांनी ऑन स्क्रीन नातं [उदे चालू ठेवले अखेर २ डिसेंबर २०२२ रोजी हे जोडपे लग्नबंधनात अडकले