लंडनहून मुंबईत परतली आलिया, रणबीरला पाहताच मारली कडकडीत मिठी

 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहे. या दोघांनीही त्यांच्या लग्नांतर दोन महिन्यातच प्रेग्नंसीची घोषणा केली. यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वारे वाहू लागले. आलिया मागील काही दिवसांपासून तिच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये होती. आता ती मुंबईत परतली आहे.

यादरम्यान आलिया जशी विमानतळावर पोहोचली, तेव्हा तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पॅपराजींनी गर्दी केली. यावेळी आलिया तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. यावेळी रणबीरला पाहून तर आलिया खूपच खुश झाली आणि ती आपल्या भावना नियंत्रित करू शकली नाही. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आलिया भट्ट ही विमानतळावर येताच खूपच आरामदायी कपड्यांमध्ये दिसली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाच्या शर्टसोबत मॅचिंग जॅकेट आणि सैल पँट परिधान केली होती. आलियाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आलियाला पाहताच पॅपराजींनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. यावेळी आलिया खूप आनंदी दिसत होती. सर्वांचे हात जोडून अभिनंदन स्वीकारत तिनी आभारही मानले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांच्या नजरा तिच्या बेबी बंपवर खिळल्या होत्या.

Team Global News Marathi: