मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटलांना धक्का, ३ हजार कोटीच्या कमला दिली स्थगिती

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच पहिला दणका छगन भुजबळ यांनी मंजुर केलेल्या कामांना स्थगिती दिली तर आता दुसरा दणका त्यांनी जंयत पाटलांना दिला आहे.

जलसंपदा विभागाकडून 3 हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती त्याला तातडीने स्थिगीती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कामे फक्त एका सांगली जिल्ह्यात होणार होती जिल्ह्यातील 3000 कोटी रुपयांची सिंचनाची कामे लटकणार आहेत.

दैनिक पुढारीच्या वृत्तपत्रानुसार, सिंचन योजनांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील सर्व गावात पाणी देण्याचा निर्णय तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आला होता. त्यासाठी 3 हजार 858 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती. सुमारे 1 लाख 18 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार होते.

मात्र, शिंदे सरकारने जिल्हा नियोजनमधील कामांना स्थगिती देण्याचे आदेश काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 75 कोटींच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. त्यामध्ये राज्य पातळीवर नावलौकिक ठरलेली स्मार्ट पीएचसी आणि मॉडेल स्कूल या योजनांचा समावेश आहे. त्यानंतर सरकारने जलसिंचनाच्याबाबतीत दुसरा दणका दिली आहे.

Team Global News Marathi: