कियारा अडवाणी-आमिर खानच्या नव्या जाहिरातीवर संतापले विवेक अग्निहोत्री!

 

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. प्रत्येक मुद्द्यांवर बेधडकपणे आपले मत मांडण्यासाठी ते ओळखले जातात. आता ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच आमिर खानच्या नवीन जाहिरातीवर सडकून टीका केली आहे.

‘सामाजिक परंपरा बदलण्याच्या नावाखाली मूर्खपणाच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत’, असे म्हणत विवेक अग्निहोत्री यांनी या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करून निर्मात्यांना फटकारले आहे. आमिर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी त्यांच्या नव्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. ही जाहिरात एका बँकेची आहे, ज्यामुळे दोन्ही कलाकार ट्रोल देखील होत आहेत. काही यूजर्सना आमिर-कियाराची नवीन जाहिरात अजिबात आवडली नाही, ज्यासाठी त्यांना टार्गेट केले जात आहे. दोघांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. यावर ‘द काश्मीर फाइल्स’चे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

आमिरच्या या नव्या जाहिरातीमुळे विवेक अग्निहोत्री चांगलेच संतप्त झाले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर अभिनेत्याला फटकारले आहे. ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी लिहिले की, ‘असा मूर्खपणा करा आणि मग म्हणा की, हिंदू आम्हाला ट्रोल करत आहेत…’ विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्विटवर आता लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मी या बँकेत एफडी केली होती, जी आता बंद करणार आहे.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘प्रत्येकवेळी आमच्याच धार्मिक भावना का दुखावल्या जातात असे नेटकाऱ्याने म्हंटले आहे.

Team Global News Marathi: