कुठल्याही वकिलाला विचारा, संजय राऊतांनी 1 रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही

 

ठाकरे व एकनाथ शिंदे गटांचा शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात निवडणूक आयोगाने गटांचे नाव व चिन्हांबाबत निर्णय दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे राहील.

तर ठाकरे गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले. तर शिंदे गटाला चिन्हाचे नवे तीन पर्याय मागितले आहेत. याच दरम्यान संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “एकनाथ शिंदंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा शिवसेना संपवण्याचं काम करतंय” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

“संजय राऊत यांनी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. त्यांची काहीच चूक नाही. देशातल्या कुठल्याही वकिलाला विचारा. माझ्याकडून चार्जशीट घेऊन जा. यांच्यावर एफआयआर होऊ शकतो, असं कुणीही म्हणणार नाही. पण जोपर्यंत भाजपाचं राज्य आहे, हे होऊ शकत नाही.” असं म्हटलं आहे. विक्रोळीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

“उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचा बंगला सोडावा लागला तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या डोळ्यात अश्रू होते. संजय राऊतांना जेव्हा पोलीस घेऊन जात होते, तेव्हा माझ्या 84 वर्ष वय असलेल्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. हे महाराष्ट्र विसरणार नाही. मलासुद्धा ऑफर होती. मी तर संजय राऊत यांचा भाऊ.. त्यांना 50 खोके तर मला किती ऑफर असेल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता.

Team Global News Marathi: