किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊतांचं सूचक ट्विट

 

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज मुंबईच्या नरिमन पॉइंट येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली. सकाळी 12 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. मात्र सोमय्यांच्या पत्रकार परिषदे आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एक नवं ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

किरीट… आपण हे सांगू शकाल का?
260 कोटीची गुंतवणूक कोणाची आहे?
येथे nikon green ville ya project मध्ये मेधा व नील किरीट सोमय्या हे संचालक आहेत का.?
यात कोणत्या ED joint director ची बेनामी गुंतवणूक आहे?
महाराष्ट्राला कळू द्या
जय महाराष्ट्र!

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीसाठी सोनिया गांधींची परवानगी घेण्यात आली असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. त्यावर खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं.

हे लोक चु# आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात अशा चु# लोकांना स्थान उरणार नाही, अशी जळजळीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. किरीट सोमय्यांनी सवाल उपस्थित केला होता की, केसीआर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सोनिया गांधींकडून परवानगी घेण्यात आली का ? त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं की, असं कोण म्हणालं? देशात असे चु## लोक खूप आहेत. अशा लोकांना प्रश्न विचारणं शोभत नाही. राजकारण देशातील अशा चु## लोकांना 2024 नंतर संपवून टाकेल.

Team Global News Marathi: