‘ईडीचा घोटाळां जरूर काढा परंतु राज्यसभेत व लोकसभेत ही जनतेचे प्रश्न मांडा’ सेना नेत्याचा घरचा आहेर !

 

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीत आता शिवसेनेचे हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने यांनी उडी घेत फेसबुक पोस्ट लिहून सेनेला घरचा आहेर दिला आहे. माजी खासदार माने यांनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

माजी खासदार माने पोस्टमध्ये लिहितात की, ईडीचा घोटाळां जरूर काढा परंतु राज्यसभेत व लोकसभेत ही जनतेचे प्रश्न मांडा ईडीचे काय वाकडे होणार हे ही आम्हाला माहीत आहे. आज पर्यंत अधिकाऱ्यांचे काय झाले ते आत्ताच होणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. ही नवीन समाजकारणाची पद्धत पहावयास मिळते आहे. ज्याला आपण सुडाचे राजकारण म्हणू शकतो,’ असं शिवाजी माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बरं आम्ही कुणाशी भांडत आहोत आपल्याशीच काँग्रेस व राष्ट्रवादी रिंगणाच्या बाहेरून मजा घेत आहे. अजित दादा वगळता या विषयावर कोणी भाष्य केलं. हे ऐकवण्यात किंवा वाचण्यात नाही. गोर- गरीबांना घरे देण्याचे सोडून आम्ही आमचीचं पाडापाडी करत आहोत. अश्याने काय साध्य होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहीती आहे. कोणी किती कष्टाने कमाई केली आहे? ते संजय राऊत कोण होते? त्यांचा पगार किती होता? किंवा नारायण राणेंचे व्यवसाय कोणते?,’ असा सवाल शिवाजी माने यांनी केला आहे.

Team Global News Marathi: